कांदा साठवणूक कशी करावी

नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की कांद्याची साठवणूक कशा प्रकारे करायची त्याचबरोबर कांद्याला कीड लागू नये त्यामुळे त्यासाठी काय खबरदारी घ्यायची व कांदा कधी काढावा याची पूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

20240619 1755425314144307895287903

जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कांदा नेमका कधी काढावा त्याचबरोबर कांद्याची साठवणूक कशी करावी त्याचबरोबर कांदा खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर कांदा जास्त दिवस कसा टिकेल यासाठी काय उपाययोजना करावी लागतील याची माहिती देखील यामध्ये आहे.

कांदा साठवण्यासाठी किती तापमान आवश्यक आहे?

कांदा साठवण्यासाठी अशी ठराविक कुठले तापमान असायला हवे असे नाही परंतु जर आपण 30 ते 35 डिग्री अंश सेल्सिअस या तापमानामध्ये जर आपण कांदा साठवला तर त्यामध्ये आपल्याला कांदा जास्तीत जास्त दिवस टिकतो टिकू शकतो कारण. तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कांद्याला 60 ते 70 टक्के आर्द्रता प्राप्त होते त्यामुळे जास्तीत जास्त दिवस हा कांदा टिकतो.

कांदा जास्त काळ कसा साठवायचा?

जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्याला माहित असेल की जर जास्त दिवस कांदा टिकून ठेवला किंवा जास्त दिवसांनी जो कांदा विकला तर त्याचा आपल्याला कुठे फायदा होतो त्यामुळे प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त दिवस कांदा कसा टिकावता येईल याची काळजी घेत असतात त्यामुळे आज आपण पाहूयात की कांदा जास्तीत जास्त जर टिकवायचे असेल तर आपल्याला 45 ते 55 अंश सेल्सिअसच्या तापमानामध्ये कांद्याला ठेवावे लागेल त्यासाठी आपल्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये कुठेही आपण याचे नियोजन करू शकतो.

कांद्याची काढणी कधी करायची?

जे नवीन शेतकरी असतात त्यांना माहित नसते की कांदा नेमका कधी काढावा किंवा कांदा काढण्याची वेळ कधी येते कारण जे नवीन शेतकरी असतात त्यांना याचे अगोदर माहिती नसते त्यामुळे जर आपल्या कांद्याची पात किंवा शेंडा हा पडत असेल किंवा आपल्या शेतातील 80 ते 90% कांद्याचा सेंड हा पडलेला आहे तेव्हा आपण कांदे काढू शकतात.

उन्हाळ्यात कांदा कसा साठवायचा?

सर्वात जास्त जपण्याचा वेळ म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त कांद्याला जपावे लागतील त्यामुळे कांद्याला आपण जास्त जास्त टिकवण्यासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये कांदा खराब होऊ नये यासाठी आपण थंड हवेच्या ठिकाणी आपण कांदा ठेवला पाहिजे म्हणजेच 32 ते 40 डिग्री जिथे तापमान असेल किंवा असे तापमान तयार करून त्या तापमानामध्ये आपण कांदा ठेवला पाहिजे कारण तर जास्तच ऊन त्या कांद्याला लागले तर त्यामुळे कांदा हा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे 35 ते 40 डिग्री सेल्सियस या तापमानामध्ये आपण कांद्याला ठेवले पाहिजे.

कांदा सडणे कसे टाळायचे?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की कांदा सडायचे मुख्य कारण म्हणजे ओलावा जर आपल्या कांद्याच्या खाली ओलावा निर्माण झाला तर आपले कांदे सोडू लागतात किंवा एखादा कांदा किंवा आपल्या कांद्यातील काही कांदे सडके असले किंवा खराब झालेले असले तर त्यामुळे देखील आपले बाकीचे कांदे खराब होतात त्यामुळे मुख्य कारण म्हणजे जर आपण जिथे कांद्याची साठवणूक केलेली आहे त्याच्या बाजूला कुठेही पाण्याचा स्रोत असा ठेवू नये जर आपण ठेवलेल्या कांद्याच्या बाजूला कुठे पाणी पडले किंवा पाणी सांडले त्याचा थेट परिणाम आपल्या सर्व कांद्यावर होऊ शकतो त्यामुळे शक्यतो कांदा जपण्यासाठी किंवा कांदा सोडू नये त्यासाठी मुख्य म्हणजे आपला कांदा हा पाण्यापासून दूर ठेवावा.