मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे ? अर्ज कसा करायचा पहा सविस्तर माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : काल माहितीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची आणि चडचणी जाणारी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना या योजनेची सुरुवात काल करण्यात आली . परंतु नेमकी ही योजना आहे काय आणि कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो याची पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला आणि तरुणींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला कशा आत्मनिर्भव होतील याकडे केंद्रलक्षित केले आहे त्याचबरोबर मुलांच्या आरोग्यावर देखील सुधारणा व्हावी यामुळे सुद्धा या योजनेची सुरुवात केलेली आहे .परंतु नेमकी ही योजना काय आहे याची सविस्तर माहिती आपण आधी पाहूया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे

मित्रांनो तुम्हाला माहित असेल की 26 जानेवारी 2023 पासून मध्य प्रदेश मध्ये या योजनेला सुरुवात करण्यात येईल असं घोषणा देखील माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी केली होती आणि त्यानंतर या योजनेचे लाभ देखील मध्य प्रदेश मधील अनेक महिलांनी घेतला होता या योजनेमध्ये महिलांना प्रत्येकी महिना एक हजार रुपये दिले जातात .

प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये ही योजना खूपच चर्चेमध्ये होती योजनेचा लाभ अनेक महिला त्यावेळेस घेत होत्या योजनेमुळे शिवराज चव्हाण यांना एक नवीन ओळख मिळाली होती या योजनेमुळेच शिवराज चव्हाण हे पूर्ण मध्य प्रदेश मध्ये अत्यंत प्रचलित झाले होते .आणि आता महाराष्ट्र सरकार देखील या योजनेला येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये फायदा व्हावा या अनुषंगाने सुरू करत आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत .

काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे .या योजनेचा लाभ सर्वात जास्त म्हणजे 21 ते 60 वयातील महिला यांना मिळणार आहे . कारण या योजनेच्या माध्यमातून 21 ते 60 वयातील महिलांना प्रत्येकी महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात .परंतु या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी आपली वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पेक्षा कमी असायला हवे .

काल या योजनेची घोषणा करण्यात आली होती परंतु ही योजना जुलैपासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये लागू करण्यात येणार आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने अजून एका योगी ची घोषणा देखील केलेली आहे ती म्हणजे मोफत गॅस सिलेंडर योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार असे देखील काल जाहीर करण्यात आले .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत

जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपले वय 21 ते 60 यामध्ये असायला हवे .. त्याचबरोबर आपले उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा कमी असायला हवे . महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाने एक उचललेलं नवीन पाऊल आहे . परंतु येणाऱ्या निवडणुकीला फायदा व्हावा यासाठी राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे असं चर्चा सगळीकडे होत आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता

या लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला विवाहित असणे किंवा घटस्फोटीत असणे आवश्यक आहे .तुमचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 60 इतकी असायला हवे.त्याचबरोबर ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या महिलांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कोण अपात्र असेल

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्ती कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी असेल त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिलांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा .ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिलांच्या घरी पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी .ज्या महिलांच्या परिवारातील सदस्यांच्या नावावर कोणतेही वाहन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडे आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कुटुंबाचा उत्पन्न दाखला त्याचबरोबर बँक खाते आणि पासपोर्ट साईज फोटो . व रेशन कार्ड असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपण ऑनलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कसा करावा

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या जवळील शेतीमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता परंतु या योजनेसाठी आपण आधी पात्र आहोत की नाही याची आपण पडताळणी केली पाहिजे . ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही अशा महिलांनी आपल्या अंगणवाडी या ठिकाणी अर्ज करू शकता .या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज हा अंगणवाडी विभागांमध्ये मिळेल .

अर्ज भरण्यासाठी कोणतेही चलन किंवा कोणतीही फी आकारली जाणार नाही त्यामुळे जर कोणी आपल्याला पैसे मागत असेल तर त्या व्यक्तीस नक्की सांगावे की ही योजना विनामूल्य आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत .ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिलांनी सदरील ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे .